महाराष्ट्र दारुबंदी विभागांमध्ये पोलिस शिपाई , वाहनचालक व शिपाई पदांसाठी मोठी मेगाभरती 2023 !
महाराष्ट्र शासनांच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग दारुबंदी विभागांमध्ये लवकरच जवान , वाहनचालक , चपराशी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता राज्य शासनांकडून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची निवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
पदांचे नावे व पदसंख्या : – सदर पदभरती प्रक्रिया मध्ये 1. पोलिस शिपाई ( जवान )
2. वाहनचालक
3. चपराशी
या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये एकुण 3842 पदे मंजुर आहेत , यापैकी दारुबंदी विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या पोलिस जवान , वाहनचालक व चपराशी या पदांच्या 950 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येणार आहेत .
आवश्यक पात्रता :– सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वाहनचालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
तर यांमध्ये पोलिस जवान व जवान – नि वाहनचालक या पदांकरीता पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी असणे आवश्यक आहे , तर छाती 79 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे .
तर महिला उमेदवारांकरीता उंची 165 से.मी असणे आवश्यक आहे तर किमान वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक असणार आहे .
जे उमेदवार सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार शारिरीक अर्हतेत पात्र ठरतील त्याच उमेदवारांची शक्यतत्याच दिवशी मैदानी चाचणी घेण्यात येईल. शारिरीक पडताळणीच्या वेळी उक्त नमुद निवड समितीच्या सदस्यांपैकी किमान चार सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शारिरीक पडताळणीच्या निष्कर्षाबाबत उमेदवाराचा आक्षेप असल्यास सदर उमेदवारांना शारिरीक तपासणीच्या फेरपडताळणीसाठी प्रत्यक्ष शारिरीक पडताळणी कार्यक्रमाची “व्हिडीओ फोटोग्राफी करण्यात यावी.
शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल.
निवड प्रक्रिया :–
जवान , जवान नि- वाहनचालक पदांकरीता निवड प्रक्रिया राबविताना प्रथम 120 गुणांची लेखी परीक्षा व नंतर 80 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे . तर चपराशी या पदाकरीता फक्त 200 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येणार आहे .
लेखी परीक्षा स्वरूप:-
लेखी परीक्षेला तुम्हाला ४ विषय असणार आहेत
- मराठी संबंधित प्रश्न – ३० प्रश्न व गुण पण ३०
- इंग्रजी – या मध्ये ३० प्रश्न असणार ते पण ३० गुणांसाठी असणार
- सामान्यन्यान – या मध्ये ३० प्रश्न असणार ते पण ३० गुणांसाठी असणार
- बौद्धिक चाचणी – या मध्ये ३० प्रश्न असणार ते पण ३० गुणांसाठी असणार
अशा प्रकारे १२० प्रश्न १२० गुणांसाठी विचारले जाणार आहेत
अभ्यसक्रम :-
उक्त नमुद विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.
१ बुध्दिमापचाचणी:- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील
२ सामान्य ज्ञान:- महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी -
3 मराठी:- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ,वाक्यातउपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
४ इंग्रजी:- Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage
जे उमेदवार लेखी परीक्षेत किंमत ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवार शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी साठी पात्र ठरतील
नकारात्मक गुणदान:-
i. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा » एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
ii. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित
केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता २५% किंवा » एवढे गुण एकूण
गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
iii. वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
iv. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
१२० पैकी तुम्हाला किंमत कमी ५४ मार्क्स असायला हवेत
शारीरिक पात्रता :-
वरीलप्रमाणे मैदानी चाचणी ८० गुणांची असून त्यांचे गुण विभाजन मैदानी प्रकारानुसार खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
१. पुरुष उमेदवारांसाठी :-
अ) १.५ कि.मी. धावणे (३० गुण)
ब) १०० मीटर धावण (३० गुण)
क) गोळा फेक (गोळा वजन ७.२६० कि.ग्रॅ.) (२० गुण
२. महिला उमेदवारांसाठी
अ) १ कि.मी. धावणे (३० गुण
ब) १०० मीटर धावणे (३० गुण)
क) गोळा फेक (गोळा वजन - ४ कि.ग्रॅ.) (२० गुण)
वर नमुद केल्यानुसार जवान व जवान नि वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या भरता प्रक्रियताल
लेखी परिक्षेतील गुण आणि शारिरीक पात्रता पडताळणी अंतो मैदानी चाचणीचे गुण यांची एकत्रित बेरीज करुन त्याआधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येनर आहे
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा